About Us
Learn more about Leva Navyuvak Sangh
विवाहेच्छुकांना त्यांच्या मनाजोगते विवाहस्थळ शोधणे फार मोठे आव्हान असते. याच आव्हानांवर मात करण्यासाठी लेवा पाटीदार समाजातील सकारात्मक विचारधारी व्यक्तींनी एकत्र येऊन गिरणा-तापी सांस्कृतिक मंडळाची स्थापना कै. प्रा. रामचंद्र दशरथ भोळे यांच्या पुढाकाराने १९८७ मध्ये केली. याच छत्राखाली पहिला विवाहेच्छुक वधू-वर मेळावा घेतला. सन २००१ पासून कै. युवराज महाजन व त्यांचे सहकारी या सर्व नवयुवकांनी मिळून लेवा नवयुवक संघाची स्थापना केली. लेवा नवयुवक संघाचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी आहेत.
गेल्या ३५ वर्षांपासून लेवा नवयुवक संघ वधू-वर मेळाव्याचे आयोजन यशस्वीरित्या करत आहे. वधू-वर परिचय मेळावा हि काळाची गरज आहे. सर्व जगभर विखुरलेल्या लेवा पाटीदार समाजाच्या विवाहेच्छुक वधू-वरांच्या नाव नोंदणीसाठी जवळपास ३०० फार्म कलेक्शन सेंटरचे जाळे लेवा नवयुवक संघाने विणलेले आहे. दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण वधू-वर सूचीचे प्रकाशन होते- जळगांवच्या वधू-वर सूचीचे वैशिष्ट्ये म्हणजे वधू-वरांचे शिक्षणानुसार व वयानुसार वर्गीकरण केले आहे. यामुळे मनाजोगा जोडीदार शोधण्यास सुलभ होते.
लेवा नवयुवक संघाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाइल ॲप बनविले आहे. ह्या ॲप चे ६ व्या वर्षात पदार्पण झाले असून मोबाइल ॲप आता नव्या रूपात समाज बांधवांच्या सेवेसाठी सादर केले आहे.
समाजबांधव बाहेरील देशातून सुद्धा जळगाव वधु वर सूची मध्ये नाव नोंदणी करू शकतात. तसेच जगभरातून हि सूची ऑनलाइन बघू शकतात.
लेवा नवयुवक संघ नोंदणीकृत धर्मदाय संस्था आहे. आम्ही कुठलीही देणगी स्वीकारत नाही.